Breaking News

वर्ल्डकप फुटबॉलवर दहशतवादी सावट


पॅरिस : सर्वत्र फ़ुटबाँलचा फिवर पसरवणाऱ्या आणि अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेल्या रशियात होणाऱ्या फिफा वर्ल्डकप फुटबॉलवर दहशतवादी हल्ल्यांची छायाआहे, असा अंदाज संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. गेल्या वर्षाखेरीस इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचे प्रचाराचे काम पाहणाऱ्या वफामीडियाने सोशल मीडियावर मेसी, नेमार अशा स्टार फुटबॉलपटूंच्या छायाचित्रांचा वापर करून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यापासून वर्ल्डकपलादहशतवादाचा धोका असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

या संरक्षण तज्ज्ञांच्या मते गेल्या काही वर्षांत रशियात इस्लामिक स्टेटच्या माध्यमातून यशस्वी किंवा अपयशी हल्ले करण्यात आले आहेत. त्यामुळे रशियात होतअसलेल्या वर्ल्डकपवर त्याची छाया असू शकते. स्थानिक जिहादी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून असे हल्ले केले जाऊ शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. मध्य पूर्वेतूननुकतेच परतलेले काही अतिरेकी यात भाग घेऊ शकतात. वॉशिंग्टनमधून जाहीर करण्यात आलेल्या अहवालात रशियातून जवळपास ८५०० जिहादी इस्लामिकस्टेटमध्ये दाखल झाले होते. त्यातील काही लोकांना रशियात जाऊन काही काळ शांत बसण्याचा आणि वर्ल्डकपदरम्यान घातपाती कारवाया करण्यासाठी प्रवृत्तकेले जाऊ शकते.

तसे पाहिले तर रशियापूर्वीही २०१६ची युरो अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धा, लंडनमधील वर्ल्डकप आणि २०१६ची रिओ ऑलिम्पिक स्पर्धा यावरही दहशतवादाचीसावली होती. त्यामुळे रशियातील वर्ल्डकपही त्यापेक्षा वेगळा नसेल. रशियातील १२ स्टेडियम्सवर हे सामने होत आहेत. त्यामुळे तेथे सुरक्षेचा कडक बंदोबस्तठेवण्यात आला आहे.