पंचायत समितीस शिवराज्यभिषेक दिनाचा विसर
पारनेर / प्रतिनिधी : 6 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्यभिषेक दिन संपुर्ण महाराष्ट्रात साजरा होत असताना, पारनेर शहरातील पंचायत समितीमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन तर सोडाच, साधा पुष्पहार सुध्दा न घातल्यामुळे पारनेर तालुक्यातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे या शिवप्रेमींनी पारनेर पंचायत समितीवर निषेध मोर्चा काढुन आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
6 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतो. मात्र पारनेर पंचायत समितीस त्याचा विसर पडला. दिवसभरात पंचायत समितीमध्ये असणार्या शिवछत्रपतींच्या पुतळ्याला पंचायत समितीतील संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. पुतळ्यास पुष्पहार न घालता एक प्रकारे अवमानच केला. हे वृत्त रात्री शिवप्रेमींना समजतात, अनेक शिवप्रेमींनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. दुसर्या दिवशी निषेध मोर्चा पंचायत समिती कार्यालयावर नेवून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्यामुळे पंचायत समिती सभापती राहुल झावरे यांनी झालेल्या प्रकरणाची जबाबदारी स्विकारुन आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. वृत्तपत्रातुन जाहीर माफी मागावी, अशी मागणी शिवप्रेमीनी केली. यावेळी सभापती राहुल झावरे उपस्थित नसल्याने, त्यांच्या खुर्चीस हार घालुन त्यांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. यावेळी तुषार औटी, संभाजी मगर, विजय औटी, भाऊसाहेब खेडेकर, धिरज महांडुळे, रामदास पुजारी, सचिन नगरे, गोपी काळभोर, सुदर्शन नरवडे, बाळासाहेब शेटे, बाळासाहेब नगरे, रायभान औटी, योगेश बापु, फहाद सादीक, औटी तुषार, नामदेव औटी, सतिष औटी, सिध्दांत देशमाने,
सुरेश औटी, योगेश देशमाने, ऋषिकेश अऩिल, परेश होनराव, अऩिकेत सोबले आदी शिवप्रेमी निषेध मोर्चामध्ये सहभागी होते. पारनेर शहरात शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास एकमेव पुतळ्यास पुष्पहार घालुन अभिवादन करणे आवश्यक होते. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने संतप्त शिवप्रेमींनी निषेध व्यक्त केला. तरीदेखिल सभापती व कुठलाही पदाधिकारी यांचेमध्ये आंदोलनकर्त्यांचे निवेदन घेण्यासाठी पुढे जायचे याबाबत, गोंधळाचे वातावरण तयार झाले. संबंधित जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने पंचायत समितीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला, एवढे सर्व होऊन देखिल, कर्मचार्यांंना या विषयाचे गांभिर्य नव्हते. तसेच पं. स. सभापती राहुल झावरे यांना दुरध्वनी वरुन संपर्क करुन वरिल प्रकरणाविषयी विचारले असता, उत्तर देण्यास टाळल्याने झावरेंनी हे प्रकरण किती गांभिर्याने घेतल्याचे दिसुन येते.