खिरविरेत सचिव भाऊसाहेब ढोले यांचा सेवापूर्ती सोहळा
पिंपळगाव नाकविंदा : अकोले तालुक्यातील खिरविरे तसेच एकदरे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे सचिव भाऊसाहेब ढोले हे नुकतेच सेवानिवृत्त झाल्याने येथील ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष एकदरे सहकारी संस्थेचे चेअरमन गोगा चौरे हे होते.
यानिमित्ताने खिरविरे सहकारी संस्थेचे चेअरमन कारभारी डगळे, व्हा. चेअरमन प्रकाश पराड, एकदरेचे व्हा. चेअरमन अशोक भांगरे, अमृत सागर दुध संस्थेचे संचालक सुभाष बेणके, माजी सरपंच गणपत डगळे, सदस्य पंढरी बेणके, शाखाधिकारी विष्णु तळपाडे, दादा आवारी, कैलास पराड, दुंदा कदम, कुंडलीक बेणके, संतु बेणके, निवृत्ती लोहकरे, भिमराव बेणके, कॅशिअर लक्ष्मण डगळे, त्रिंबक बेणके, राजु आवारी, निवृत्ती डगळे, शांताराम बेणके यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी सत्काराला उत्तर देताना सचिव भाऊसाहेब ढोले यांनी सांगितले की, अहंकारामुळे देखील अनेक नाती तुटतात. प्रत्येक वेळी फक्त चुकाच कारणीभूत नसतात. गर्वाचा त्याग केल्यास माणुस लोकांच्या प्रेमास पात्र होतो. राग सोडल्यास दुःख होत नाही. अभिलाषा सोडली की, माणुस श्रीमंत होतो, लोभ सोडला की, खरा सुखी होतो, हेच जिवनाचे सत्य असल्याचे प्रतिपादन केले.
अमृतसागर दुध संघाचे संचालक सुभाष बेणके यांनी आयुष्यात घेण्यापेक्षा देणं महत्वाचे आहे. प्रत्येकाला काहीतरी दयायचे आहे, हे विसरू नका. घेणार्यापेक्षा देणार्यालाच प्रतिष्ठा मिळते. कोणत्याही अपेक्षेशिवाय कोणाचेही चांगले करण्याचा प्रयत्न करा. कार्यक्रम यशस्वीतेसाठी खिरविरे तसेच एकदरे सहकारी संस्थेचे चेअरमन,व्हा. चेअरमन, सदस्य तसेच ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्हा. चेअरमन प्रकाश पराड यांनी करून शेवटी उपस्थितांचे आभार मानले.