परिवर्तन चळवळीतील जाणते युगपुरुष राजर्षी शाहू महाराज
कुळधरण / प्रतिनिधी
परिवर्तन चळवळीतील जाणते युगपुरुष म्हणून राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याकडे पाहिले जात असल्याचेे प्रतिपादन प्राचार्य श्रावण गिरी यांनी केले.
कुळधरणच्या छत्रपती पब्लिक स्कुलच्या शाहू महाराज जयंती कार्यक्रमात अध्यक्षीय समारोप करताना ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लक्ष्मण सुद्रिक उपस्थित होते. पुढे बोलताना गिरी म्हणाले की, बहुजनांसाठी राजाश्रय देणारे शाहू महाराज सामाजिक क्रांतीचे प्रणेते असून, बहुजनांना संधी देणारे युगपुरुष होते. 1902 साली मराठा आरक्षण, आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार करुन त्यांच्याकडे समाजाचे नेतृत्व जाहीरपणे घोषित करणे, त्याकाळी भरचौकात कांबळे या मागासवर्गीयाच्या हॉटेलमध्ये सामुहिक चहा घेणे आदी कृतीयुक्त सहभागातून त्यांनी आपली भूमिका आणि चळवळ स्पष्ट केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता कापसे, प्रास्ताविक सचिन बाराते आणि आभार रमेश पवार यांनी मानले. यावेळी के.आर. घालमे, विश्वा शिंदे, प्रेमलता शिंदे, अनुमोवा पवार, गणेश चव्हाण, रमाकांत गजरमल, उमेश पवार उपस्थित होते.
भांबोरा येथील श्री सिध्देश्वर विद्यालयात छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक मच्छिंद्र बेद्रे, पर्यवेक्षक बाळासाहेब घोरपडे, ज्येष्ठ शिक्षक दिलीप कसबे, रोहिदास परकाळे, उर्मिला शिर्के, स्वाती गावडे, सुवर्णा फुले, वैशाली अनारसे यांसह आदी शिक्षकांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पर्यवेक्षक बाळासाहेब घोरपडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जालिंदर सोनवणे यांनी तर, गोविंद लोखंडे यांनी आभार मानले.