महिला आशिया चषक – भारत विजयी
नवी दिल्ली
महिला आशिया चषक टी-२० मध्ये भारतीय महिलांनी श्रीलंकेच्या संघावर ७ गडी राखून मात करत मालिकेतला तिसरा विजय नोंदवला. या विजयासह भारतीयमहिलांचं अंतिम फेरीत स्थान मिळवण्याच्या शक्यता अजुनही कायम आहेत. डावखुरी फिरकीपटू एकता बिश्तची अष्टपैलू कामगिरी आणि इतर गोलंदाजांनीतिला दिलेली साथ हे आजच्या दिवसाच्या खेळाचं प्रमुख वैशिष्ट्य राहिलं.
मिताली राजने २० धावात २ बळी घेत २ श्रीलंकन फलंदाजांना धावचीत करुन माघारी धाडलं. भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा केल्यामुळे श्रीलंकेचा संघ १०७धावांवर आटोपला. श्रीलंकेने दिलेल्या १०८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने डावाची आक्रमक सुरुवात केली. मात्र ठराविक अंतरानंतरभारताच्या ३ फलंदाज माघारी परतल्या. ७०/३ या धावसंख्येवरुन वेदा कृष्णमुर्ती आणि अनुजा पाटील यांनी नाबाद ४० धावांची भागीदारी रचत भारताच्याविजयावर शिक्कामोर्तब केलं.