Breaking News

नदालला पावसाचा आधार

पॅरिस 

उपांत्यपूर्व फेरीदरम्यान पाऊस आला आणि माझी झुंज थांबली. ती आज पूर्ण झाली. त्याचा मला एकप्रकारे फायदाच झाला. पहिला सेट मी गमावला होता. तोसामन्यातला सर्वात आव्हानात्मक अन् कठीण क्षण होता. त्यामुळे तेव्हा पावसामुळे सामना थांबणे पथ्यावर पडले असे प्रतिपादन केले आहे खुद्द गतविजेतारफाएल नदालने. पावसाचा व्यत्यय आलेल्या या लढतीत नदालने अर्जेंटिनाच्या दिएगो श्वार्टमनची झुंज ४-६, ६-३, ६-२, ६-२ अशी मोडून काढत अकराव्यांदा फ्रेंचओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. बुधवारी नदालने श्वार्टमनविरुद्धचा पहिला सेट गमावला होताच; पण मनगटाच्या दुखापतीचात्रास जाणवत असल्याने त्याने वैद्यकीय मदतही घेतली होती. अखेर तीन तास ४२ मिनिटांच्या झुंजीनंतर नदालने उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. 'श्वार्टमनजबरदस्त खेळला. मी मात्र खूप सावध खेळत होतो. मी काहीसा दडपणाखालीदेखील होतो. याचा श्वार्टमन खूप छान फायदा उठवत होता. नंतरच्या सेटमध्ये मात्रमी आक्रमक खेळ केला, ज्याचा मला फायदा झाला', असे नदाल म्हणाला.