शेतकरी आंदोलकांवर गुन्हे दाखल
।संगमनेर/प्रतिनिधी
राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करणाऱ्या ४२ जणांविरुद्ध घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.
मागील आठवड्यात मंगळवारी {दि. ५ } तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबीखालसा फाट्यालगत असणाऱ्या मोकळ्या जागेत हे आंदोलन झाले होते. राष्ट्रीय किसान महासंघ व किसान क्रांती जनआंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.
या आंदोलनात सर्वश्री सुरेश गाडेकर, दत्तू बन्सी कोन्होरे, बाळासाहेब निवृत्ती ढोले, अरुण लक्ष्मण कान्होरे, बाळासाहेब लक्ष्मण गाडेकर, नामदेव लक्ष्मण गाडेकर, भाऊसाहेब गुलाबराव ढमढेरे, किरण राजेंद्र भोर, सोमनाथ मनोहर पापळ, कैलास बन्सी पापळ, दादा मनोहर ढमढेरे, नितीन शिवाजी काशिद, दिपक सर्जेराव ढमढेरे आदींसह ४२ जणांनी भाग घेतला होता. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल किशोर लाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक दिलीप निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय विखे हे करत आहेत.