‘संजीवनी’च्या विद्यार्थ्यांची ‘एस्काॅर्ट’मध्ये निवड
कोपरगाव शहर प्रतिनीधी:
ट्रॅक्टर, शेती औजारे व बांधकाम क्षेत्रातील उपकरणे आदी क्षेत्रात जगभरात प्रसिध्द असलेल्या एस्कॉर्ट कंपनीने संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांची सेल्स अॅण्ड मार्केटींग मॅनेजर पदावर कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत निवड केली आहे. प्रशिक्षण काळात या विद्यार्थ्यांना ३ लाख ६ हजारांचे वार्षिक पॅकेज देण्यात येणार आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दिली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये महेश मोरे, समाधान भवर, योगेश गायके आणि समाधान ढमाले या गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश आहे. प्राचार्य डाॅ. डी. एन. क्यातनवार यांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची मुलाखतींना सामोरे जाण्याची संपूर्ण तयारी करून घेतली. त्यामुळे विद्यार्थी सहजरित्या नामांकित कंपन्यांच्या कसोट्याना उतरत आहेत. यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख डॉ. एस. एस. इंगळे यांनी विशेष परिश्रम घेतले. ‘संजीवनी’चे शेकडो माजी विद्यार्थी देश-परदेशात उच्च पदांवर कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या नेटवर्कमुळे ‘संजीवनी’च्या अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळत आहेत. ग्रामीण भागातील पालकांनी ‘संजीवनी’ला धन्यवाद दिले.