वृक्षारोपणामुळे कमी वेळेत झाली वटपोर्णिमा!
कोपरगाव शहर प्रतिनिधी
मागील वर्षी ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा’ मोहिमेअंर्तगत विविध संघटनांनी मोठमोठया झाडांचे वृक्षारोपण केले होते. त्यामुळे वटपोर्णिमेनिमित्त महिलांना वटवृक्ष शोधत फिरण्याची गरज पडली नाही. पूर्वी गावातील एकाच वटवृक्षाभोवती होणारी गर्दी कमी होऊन महिलांना कमी वेळेत पुजा करता आली.
दरम्यान, नगरपालिकेने मात्र वडाच्या या झाडांभोवती साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावली नाही. त्यामुळे महिलांना या पाण्यातूनच वाट काढत वडाची पूजा करावी लागली. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाविषयी महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.