Breaking News

महिलांनी आरोग्यासोबत संस्कारिक मूल्यांची जोपासना करावी : मिनाक्षी साळुंके

कुळधरण / प्रतिनिधी । महिलांनी आपल्या दैनंदिन जीवनात आरोग्याबरोबर विविध संस्कारिक मूल्यांची जोपासना करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका मिनाक्षी साळुंके यांनी केले. कर्जत तालुक्यातील अळसुंदे येथील परिवर्तन प्रतिष्ठान तसेच आरोग्य विभाग व एकात्मिक बालविकास विभाग यांच्यावतीने महिला मेळावा व हिमोग्लोबिन तपासणी शिबीरात त्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होत्या. अळसुंदे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा कार्यक्रम संपन्न झाला.

एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी शोभा तापकिर, डॉ. मुळे यांनी किशोरवयीन मुली व महिलांना मार्गदर्शन केले. महिलांच्या जीवनातील आरोग्यविषयक विविध समस्या व त्यासंबंधी घ्यावयाची काळजी, तसेच महिला व किशोरवयीन मुली यांच्यासाठी हिमोग्लोबिनचे महत्व याविषयी डॉ. मुळे यांनी मार्गदर्शन केले. मुलींच्या बालवयापासून म्हणजेच अंगणवाडी व प्राथमिक शिक्षणाकडे लक्ष अवस्थेपासून घ्यावयाची काळजी व मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे शोभा तापकिर यांनी यावेळी सांगितले. यावेळी सरपंच एकनाथ वाघमारे, उपसरपंच एकनाथ साळुंके, पोलीस पाटील विजयकुमार अनारसे, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष काकासाहेब अनारसे, बेबीताई साळुंके, मुक्ताबाई अनारसे, बाळासाहेब अनारसे, श्रीरंग अनारसे, चिमाजी देमुंडे, प्रा. कुशाबा साळुंके, राजेंद्र साळुंके, शिवाजी चिंधे, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा, आरोग्य व इतर विभागांचे कर्मचारी, महिला व किशोरवयीन मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमनाथ अनारसे यांनी केले. सूत्रसंचालन शाम अनारसे व चंदाराणी अनारसे यांनी केले. अनिल टकले यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी परिवर्तन प्रतिष्ठानचे सचिव तुळशिराम गदादे, सदस्य रविंद्र अनारसे, गणेश जाधव, अनिल टकले, विजय अनारसे, यांनी परिश्रम घेतले.


गुणवंतांचा सत्कार, वृक्षारोपण आणि हिमोग्लोबिन तपासणी


या कार्यक्रमात दहावी तसेच बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गावातच सत्कार झाल्याने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला. आरोग्य व एकात्मिक बालविकास विभागाच्या वतीने महिला व किशोरवयीन मुलींची मोफत हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. कार्यक्रमानंतर गावातील शासकीय कार्यालयासमोर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.