जळगाव जिल्ह्यातील घटनेविरोधात तहसिलदारांना निवेदन
जामखेड / श. प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील वाकडी ता. जामनेर येथे विहिरीत पोहल्याच्या कारणावरून, मातंग समाजाच्या तीन मूलांची अमानुषपणे नग्न धींड काढून मारहाण केलेल्या घटनेचा, निषेध करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. तहसीलदार यांना निवेदन देतांना सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले बाजार समितीचे संचालक सागर सदाफूले, सिध्दांत डाडर, पोपट फूले, नासीर सय्यद, बापूसाहेब गायकवाड, सचिन सदाफूले, विनोद कांबळे, किशोर कांबळे, रवी सोनवणे, स्वप्निल सदाफूले, आदी समाजबांधव उपस्थितीत होते.
निवेदनात म्हटले आहे की, सदर घटना पूरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे, त्या विहिरींमध्ये इतर मूलं पोहत होते, मात्र विहीर मालक व इतर आरोपींना जातीय द्वेषातून केवळ मातंग समाजाच्या मूलांचीच नग्न करून गावातून मारहाण करत धींड काढून सामाजिक वातावरण कलूषित केले. त्या आरोपींवर कठोर कारवाई करावी. जेणेकरून कोणीही अशा माणूसकीला काळीमा फासणारे कृत्य करण्यास धजावणार नाहीत.
