शहरांच्या विकासात सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचे मोठे महत्त्व - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते क्यू-आर कोड आधारित 'मेट्रो मोबाईल टिकेटींग-स्किप-क्यू' या सुविधेचा प्रारंभ करण्यात आला. तसेच माझी मेट्रो फेस्टिव्हलमध्ये पारितोषिक प्राप्त चित्रकृती, कविता आणि छायाचित्रांनी सजविलेल्या 'माझी मेट्रो आर्ट ट्रेन' चे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमास आमदार प्रसाद लाड, अमित साटम, भारती लव्हेकर, एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव,रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर्सचे समूह व्यवस्थापकीय संचालक सतीश शेठ, मुंबई मेट्रो वनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभयकुमार मिश्रा आदींची उपस्थिती होती.