Breaking News

जामगावात अभिष्ठचिंतन सोहळ्यानिमित्त निलेश लंके प्रतिष्ठाण शाखेचे उद्घाटन


सुपा : पारनेर तालुक्यातील जामगाव येथे उद्योजक सुरेश धुरपते यांच्या अभिष्ठचिंतन सोहळ्यानिमित्त जामगाव येथ निलेश लंके प्रतिष्ठान शाखेचा उद्घाटन सोहळा पार पडला, सदर कार्यक्रमाचे उद्घाटन पारनेर-नगर तालुक्याचे लोकनेते निलेश लंके व उद्योजक सुरेश धुरपते यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. जि.प. सदस्य युवराज माळी यांनी भूषविले.

यावेळी पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती सुदाम पवार, पारनेर पंचायत समितीचे मा. सदस्य राजेंद्र चौधरी, निघोजचे सरपंच ठकाराम लंके, निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष बापू शिर्के, पंचायत समिती सदस्या सुनंदा धुरपते, समर्थ कॉलेजचे संस्थापक संचालक कैलास गाडीलकर, विजू औटी संदिप सालके, जामगावचे सरपंच दिनकर सोबले, सावरगावचे सरपंच भाऊ चिकने, कोहकडीचे मा. सरपंच अरुण पवार, बाळासाहेब हिलाल, जगन्नाथ भुजबळ, बाळासाहेब सोबले, बाबाजी तरटे, बाजीराव पानमंद, अभयसिंह नांगरे, विशाल तांबे, संभाजी नरसाळे, पांडुरंग खाडे, बबन पवार, संजय खाडे, भाऊसाहेब घोलप, सुखदेव चितळकर, संदिप चौधरी, सारिका धुरपते, अलका कदम, जालिंदर मेहर, नंदू शिंदे, बाळासाहेब शिंदे, उद्धव खाडे, निलेश औटी, अनिल गंधकते, शशिकांत आंधळे, बाळासाहेब खिलारी, महेश झावरे, दत्ता निवडुंगे, श्रीकांत चौरे, बाजीराव कारखीले, नितीन चिकने, संदिप पवार, पोटघन मेजर, सतीश भालेकर, सत्यम निमसे, प्रितेश पानमंद, जावगावचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, निलेश लंके प्रतिष्ठाणचे सर्व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.