पर्यावरणाचा समतोल राखण्यास हातभार लावा : कदम
राहुरी तालुका प्रतिनिधी
हल्ली दिवसेंदिवस पर्जन्यमान कमी होत आहे. त्यामुळे पर्जन्यमान वाढविणे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. वृक्षारोपणामुळे शुध्द हवा आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने किमान एका झाडाची तरी जोपासना करुन पर्यावरणाचा समतोल राखण्यास हातभार लावावा, असे आवाहन प्रियदर्शनी महिला शेतकरी बचत गटाच्या अध्यक्षा प्रिती कदम यांनी केले.
वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडांची वृक्षारोपण करण्याची संकल्पना प्रिती कदम यांची अनेक दिवसांपासून होती. ही संकल्पना प्रत्यक्ष रुपात आली. देवळालीप्रवरा नगरपालिका कार्यक्षेत्रात नगरपालिकेच्यावतीने महाराष्ट्र वृक्षदिनानिमित्त तसेच वटपौर्णिमा सणाचे औचित्य साधून वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. यावेळी प्रिती कदम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमास नगराध्यक्ष सत्यजित कदम, उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, मुख्याधिकारी नानासाहेब महानवार, नगरसेविका अंजली कदम, कमल सरोदे, नंदा बनकर, सुप्रिया शिंदे, महानंदा कदम, मनिषा कदम, सविता कदम, कांता कदम, सुनिता कदम, साधना कदम, मिना कदम, मृणाल कदम, अनुजा कदम, अनुराधा कपिले, अनिता वीर, राणी देसर्डा, आशा कोठुळे, कविता भालेकर, पदमा कदम, सुनिता पवार, उषा राऊत, सारीका लोंढे, रोहिणी कोठुळे, कविता पवार, शोभा क्षीरसागर आदी उपस्थित होते. सुनिल गोसावी यांनी आभार मानले.