नवी मुंबई महानगरपालिकेची आजवरची सर्वात मोठी प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीम
प्लास्टिकमुळे पर्यावरणाची तसेच माणसांसह प्राणी जीवनाची होणारी हानी लक्षात घेऊन दैनंदिन वापरातून प्लास्टिकचा वापर थांबविणे आवश्यक असून नवी मुंबई महानगरपालिकेने महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या निर्देशानुसार ठोस पावले उचलण्यास सुरूवात केली आहे.
याकरिता नागरिकांचे प्लास्टिक व थर्माकोलचा वापर टाळण्याबाबत प्रबोधन करण्यासोबतच प्लास्टिक पिशव्यांचा अद्यापही वापर व विक्री करणा-यांवर दंडात्मक कार्यवाही करण्यास सुरूवात केली आहे. या अनुषंगाने जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर 4 जून रोजी बेलापूर ते दिघा अशा आठही विभाग कार्यालय क्षेत्रात व्यवसायाठिकाणी प्लास्टिक व थर्माकोल असणा-या व्यापारी, विक्रे त्यांवर धडक कारवाई करण्यात आली.
या धडक मोहिमेत महानगरपालिकेच्या आठ विभाग कार्यालय क्षेत्रात साधारणत: 9 टन इतके प्लास्टिक जप्त करण्यात आले असून परिमंडळ 1 विभाग क्षेत्रातून 7 लक्ष 12 हजार 750 तसेच प रिमंडळ 2 विभाग क्षेत्रातून 7 लक्ष 13 हजार 500 इतकी दंडात्मक रक्कम जमा करण्यात आली आहे. सदर मोहिमेमधून नागरिकांकडून दंड वसूल करणे हा उद्देश नसून याव्दारे नागरिकांमध्ये प्लास्टिक व थर्माकोल प्रतिबंधाविषयी योग्य संदेश प्रसारित व्हावा ही आयुक्तांची भूमिका आहे.
यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाचे घोषवाक्य ‘प्लास्टिक प्रदूषणास प्रतिबंध’ असे असून भारत देश हा यजमान देश आहे. त्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचे मार्गदर्शनानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या या प्लास्टिक, थर्माकोल प्रतिबंधात्मक मोहीमेत 14 लक्ष 26 हजार 250 मात्र इतकी दंडात्मक रक्कम व तब्बल 9 टन इतके प्लास्टिक, थर्माकोल संकलित करण्यात आले असून ही नवी मुंबई महानगरपालिकेने राबविलेली आजवरची सर्वात मोठी मोहीम आहे.
या मोहिमेत संकलित केलेले प्लास्टिक, थर्माकोल नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे येथील भू भरणा पध्दतीवरील शास्त्रोक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी नेण्यात आले असून महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी त्याठिकाणी अतिरिक्त आयुक्त शहर मोहन गांवकर यांचेसह प्रकल्पस्थळी भेट देऊन त्याची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त तुषार पवार, परिमंडळ 1 चे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार आणि इतर अधिकारी उपस्थित होते. या प्लास्टिक, थर्माकोलचा उपयोग नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने रस्ते बांधकामात सरफे सिंग करताना केला जाणार आहे.
नागरिकांनी प्लास्टिक, थर्माकोल वापरूच नये यासाठी व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यासोबतच नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत असून नवी मुंबईकर नागरिक ांनी आपले नवी मुंबई शहर प्लास्टिक व थर्माकोलमुक्त करून पर्यावरणशील करण्यासाठी संपूर्ण योगदान द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
