Breaking News

कोपरखैरणे : अतिक्रमण निर्मुलन कारवाईत दोन पोलीस जखमी


सिडकोद्वारे आज कोपरखैरणे रेल्वे स्टेशन जवळील 8 भूखंडावरील 1 कृत झोपडपट्ट्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान संतप्त झोपडपट्टीवासियांनी पो लिसांवर दगडफेक केली. या मध्ये दोन पोलीस अधिकारी व 5 पोलीस कर्मचारी जखमी झाले .

या कारवाईमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी आवटे जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इतर जखमी पोलिसांवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.या प्रकरणी आठ महिला व पाच पुरुषांना अटक करण्यात आली आहे. कोपरखैरणे रेल्वे स्थानकाच्या जवळील भूखंड सिडकोने निविदा पद्धतीने विक्री केले होते; मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या भुखंडावर तब्बल 100 झोपडपट्यांचे अतिक्रमण होते. यापूर्वी अनेक वेळा सिडकोने या ठिकाणी कारवाई केली होती. कोपरखैरणे रेल्वे स्टेशनबाहेर सिडकोचे 8 भूखंड आहे. यातील काही भुखंड विक्री झाले असून अन्य भुखंडांवर झोपड्यांचे अतिक्रमण होते. गेल्या सहा वर्षांपासून अतिक्रमण सुरु आहे. हा भूखंड सिडकोचा असल्याने महापालिकेकडून कारवाई केली जात नव्हती. सिडकोने उशिरा कारवाई केल्यामुळे झोपडपट्ट्या वाढत गेल्या होत्या. त्यानुसार सिडकोने आज सकाळी पुन्हा कारवाई सुरू केली होती. ही कारवाई सुरू होताच येथील संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली.

या दगडफेकीमध्ये कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी आवटे यांच्यासह 5 पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अनधिकृत झोपडपट्ट्यांवर कारवाईसाठी सिडकोने नोटीस पाठवली होती. पण योग्य वेळी सिडको व महापालिकेनेही ठोस कारवाई न केल्याने झोपडपट्ट्या वाढल्या असा आरोप केला जात आहे. दरम्यान आजच्या कारवाईमुळे या परिसरात तणाव निर्माण झाला होता. दगडफेकीनंतर सीबीडी, कोपरखैराणे आणि ऐरोली पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली. तसंच राखीव पोलिस दलालाही बोलवण्यात आलें होते. या कारवाईदरम्यान दगडफेकीत एक 1 पोकलन व 3 पोलिसांच्या गाड्यांचे नुकसान झाले आहे.