‘प्रवरा’तर्फे २९ ला शैक्षणिक साहित्य वाटप
प्रवरानगर प्रतिनिधी
पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रवरा माध्यमिक विद्यालय, आडगाव येथे येत्या शुक्रवारी {दि. २९ } दुपारी अडीच वाजता गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, स्नेहभोजन व नवीन वर्गखोल्यांचा उघाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आडगाव बुद्रुक येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या खत डेपो विक्री शुभारंभही राज्याचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक रामदास जाधव यांनी दिली.
अध्यक्षस्थानी आडगाव बुद्रुकचे प्रगतशील शेतकरी मुरलीधर शेळके होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आबासाहेब खर्डे, पंचायत समितीच्या सभापती हिरा कातोरे, बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर, उपसभापती बाबासाहेब म्हस्के, पंचायत समिती सदस्य संतोष ब्राह्मणे, माजी सभापती सुभाष विखे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सोसायटीचे चेअरमन सिताराम शेळके, स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष कोंडिराम शेळके, सरपंच मनीषा लहामगे, मुख्याध्यापक मुस्ताक शेख आदींसह पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.