Breaking News

आंतरखंडीय फुटबॉल स्पर्धा: 'सुनील छेत्री'ची टीम न्यूझीलंडकडून पराभूत


मुंबई

आंतरखंडीय फुटबॉल स्पर्धेतील पाचव्या सामन्यात भारताकडून सुनील छेत्रीने गोल करुन डावाला चांगली सुरवात करून देत संघाला आघाडी मिळवून दिली पण न्यूझीलंकडून आंद्रे जोंग आणि मोसेस डायरने एक-एक गोल मारत भारतीय संघाची निराशा केली आणि न्यूझीलंड संघाने भारताचा २-१ ने पराभव केला.

कालच्या सामन्यात ४७ व्या मिनिटाला दुसऱ्या हाफच्या सुरुवातीलाच सुनील छेत्रीने पहिला गोल मारत भारताला आघाडी मिळवून दिली. मात्र यानंतर लगेचच ४९ व्या मिनिटाल आंद्रे जोंगने ने गोल करुन बरोबरी केली. हाफ टाइमच्या वेळी दोन्ही संघ ०-० ने बरोबरीवर होते. सामना संपण्याच्या थोडा वेळ आधी ८६ व्या मिनिटाला मेसेस डायरने गोल करुन भारताला धक्का दिला आणि न्यूझीलंडला विजयी आघाडी मिळवून दिली.

भारताकडून आज जेजे लालपेख्लुआ याने ५० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. पराभव झाला असला तरी भारत अंतिम सामन्यात पोहोचला आहे. अंतिम सामन्यात भारत केनिया किंवा न्यूझीलंडसोबत भिडेल.