डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण, शेअर बाजारातही पडझड
मुंबई : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत गुरुवारी भारतीय रुपया घसरला. आयातदार तसेच बँकांकडून वाढलेली मागणी यामुळे रूपयांत घसरण झाली. 68.52 या स्तरापर्यंत रूपयाची घसरण नोंदविण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींचा फटका भारतीय शेअर बाजारला बसला. आंतरराष्ट्रीय शेअर बाजारातील पडझडीचे परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाले. गुरुवारी सकाळी शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स 10 अंकांनी तर निफ्टी 19 अंकांनी घसरला. सध्या सेंसेक्स 35207.19 तर निफ्टी 10651.45 अंकावर आहे. डॉलरची मागणी वाढल्यास रूपयाची घसरण होते. त्यामुळे रूपया घसरल्यास एका डॉलरसाठी आपल्याला जास्त पैसे मोजावे लागतात. रुपया विकून डॉलर खरेदी केले जातात त्यावेळी रुपयाची किंमत घसरते.