Breaking News

चार्टड विमान कोसळून 5 जण ठार

मुंबई - घाटकोपरमध्ये विमान कोसळून वैमानिकासह 5 जण ठार झाले आहेत. जागृती इमारतीजवळ हे विमान कोसळले. तढ- णझन किंग एअर सी 90 या प्रकारचे हे विमान होते. या विमानात पायलटसह एकूण चार जण होते. अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स हस्तगत करण्यात आला आहे. घाटकोपरच्या जागृती नगरमध्ये जीवदया लेनमध्ये हा अपघात झाला. या ठिकाणी एका इमारतीचे बांधकाम सुरू होते. हे विमान उत्तरप्रदेश सरकारचे होते अशीही माहिती सुरुवातीला हाती आली आहे. या विमानात पायलटसह एकूण चार जण होते. या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत. मात्र उत्तर प्रदेश सरकारने मुंबईतील णध -एव्हिएशन कंपनीला हे विमान विकले असल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वी या विमानाचा अलाहाबादमध्ये अपघात झाला होता. त्यानंतर ते विकण्यात आले होते. अपघातग्रस्त चार्टर्ड विमान जुहू येथून चाचणीसाठी निघाले होते. अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स हस्तगत करण्यात आला आहे. कॅप्टन मारिया, कॅप्टन प्रदीप राजपूत, तंत्रज्ञ सुरभी, मनीष यांच्या या अपघातात मृत्यू झाला. या अपघातात लवकुश कुमार आणि महेश कुमार निषाद हे दोन जण जखमी झाले आहेत. दुपारी 1 वाजून 16 मिनिटाला अग्निशमन दलाला घाटकोपरमध्ये विमान कोसळल्यासंबंधी माहिती मिळाली. नंतर अग्निशमन दल 1 वाजून 37 मिनिटाला घटनास्थळी दाखल झाले. शर्थीच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला 1 वाजून 40 मिनिटाला आगीवर ताबा मिळविण्यात यश आले. सी-90 जातीचे हे विमान होते. या विमानात चार जण होते, अशी माहिती मिळत आहे. आतापर्यंत पायलट, 2 पुरुष आणि एका महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह हस्तगत करण्यात आले आहेत. एकूण पाच जणांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. दुर्घटनास्थळाला महापौरांनी भेट दिली आहे. राजावाडी रूग्णालयात आतापर्यंत 5 मृतदेह दाखल करण्यात आले आहेत. राजावाडी हॉस्पिटलचे डिन विद्या ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे.