‘संजीवनी’च्या शेटेंकडे फुलले ‘ब्रम्हकमळ’
कोपरगाव शहर प्रतिनिधी
संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या माती आणि पाणी पृथ:करण प्रयोगशाळेचे अधिकारी बाळासाहेब शेटे यांच्या घरी चार ब्रम्हकमळ फुलली आहेत. या चारही फुलांची विधीवत पुजा करण्यात आली. हे ब्रम्हकमळ पाहण्यांसाठी गर्दी होत आहे.
शेटे यांनी १२ वर्षांपूर्वी श्रीरामपूरहून ब्रम्हकमळाचे एक पान आणून त्याची लागवड केली होती. तब्बल १२ वर्षांनंतर त्यांच्या घरी हे ब्रम्हकमळ फुलले. दरम्यान, उत्तरांचल राज्याचे हे राजपुष्प आहे. केदारनाथ आणि बद्रीनाथ या मंदिरात ब्रम्हकमळ अर्पण करण्याचा प्रघात आहे. हिमालयातील ११ ते १५ हजार फूट उंचीवर ही ब्रम्हकमळ वनस्पती फुलली जाते. हिमालयातील फुलांचा सम्राट म्हणूनही ब्रम्हकमळांस मान्यता आहे. हे फक्त रात्रीच उमलते.