गोरेगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : तांबे
भाळवणी : विकास कामे करण्यासाठी पदच असणे गरजेचे नाही, तर आपणांस जे विकास कामे करायची आहेत त्या, विकास कामांचा पाठपुरावा आपण लोकप्रतिनिधींकडे करावा लागतो. पारनेर तालुक्याचे आ. विजय औटी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये विकासाची गंगा सुरू आहे. त्यामध्ये गोरेगावच्या विकासकामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे मत माजी सभापती बाबासाहेब तांबे यांनी व्यक्त केले. मॉडेल व्हिलेज गोरेगाव येथे जिल्हा परिषद अहमदनगर पशुसंवर्धन समिती निधी अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये सीमेंट-काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ तांबे यांच्या हस्ते करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सरपंच सुमन तांबे, उपसरपंच दादा नरसाळे, ग्रामपंचायत सदस्य वामन चौरे, अण्णा नरसाळे, सोमनाथ तांबे, संपत नरसाळे, शिवाजी नरसाळे, सोपान नांगरे, विकास काकडे, रमेश तांबे, सुरेश चौरे, साहेबराव तांबे, गणपत तांबे, विठ्ठल काकडे, दयानंद खेनट, साहेबराव नरसाळे, मोरे गुरुजी, भाऊसाहेब तांबे, सुरेश पातारे, बाबासाहेब चौरे, प्रभाकर नरसाळे आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.