कल्पनाशक्ती ज्ञानापेक्षा अधिक महत्वाची : प्रा. थोरात
पिंपळगाव नाकविंदा
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासाचे सर्वोत्तम उदाहरण देणारे, आदर्श शासनकर्ते आणि बहुजनांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण करणारे, द्रष्टे समाजसुधारक म्हणून ख्यातनाम शाहू महाराजांनी आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर आपल्या राज्यात शिक्षण, आरोग्य, पाणी आणि जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केल्याचेे प्रतिपादन विद्यालयाच्या प्राचार्या मिनाक्षी थोरात यांनी केले.
अगस्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय समशेरपूर (ता. अकोले) येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 144 वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्या सौ. थोरात अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या.
यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक मुंतोडे शहाजी, गोडे संतोष, वाकचौरे सूचित, पुंडे प्रशांत, खरात सचिन, चौधरी शशिकांत, सहाणे मोनिका, मणियार अंजुम, बेनके सुनीता आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रा. थोरात पुढे म्हणाल्या की, शाहू महाराजांचे विचार धर्मनिरपेक्ष, बंधुता, न्याय व समतेकडे घेवून जाणारे ठरले. जातीय भेदभाव नष्ट करण्यासाठी आपला समाज शिक्षण प्रवाहात आणूनच सामाजिक एकता निर्माण करता येईल अशी महाराजांची दूरदृष्टी आपल्याकडेही असायला हवी. ज्येष्ठ शिक्षक प्रा. धुमाळ यांनी जातीय सलोखा व शिक्षण यामध्ये कशाप्रकारे महाराजांची दूरदृष्टी वापरून बदल करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले.
विद्यालयाचे पर्यवेक्षक अडांगळे यांनी सबका साथ सबका विकास ही संकल्पना महाराजांनी त्यावेळी कशाप्रकारे अमलात आणली व स्त्री न्याय हक्क आणि कायदा यांची अमलबजावणी करण्यास प्रथम महाराजांनी सुरुवात केली, म्हणूनच महाराजांना आरक्षणाचे जनक व शिक्षण प्रेमी ही ओळख मिळवली असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वाकचौरे एस.एम यांनी तर, प्रास्ताविक अल्हाट एस.जी आणि आभार प्रा. नाईकवाडी बी.बी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परीश्रम घेतले.