Breaking News

नोकरीवरून काढून टाकले म्हणून कर्मचार्‍याचा गोळीबार

गुरुग्राम : नोकरीवरून काढले म्हणून संतप्त झालेल्या कर्मचार्‍याने मानव संसाधन (एच आर) विभागाच्या प्रमुख अधिकार्‍यावर गोळी झाडल्याचा प्रकार घडला आहे. गोळीबारात संबंधित अधिकारी जखमी झाला आहे. एच आर विभागाचे प्रमुख बिनेश शर्मा कारने मानेसर येथील आपल्या कार्यालयात जात असताना आरोपी जोगिंदर आणि अन्य एका अज्ञात व्यक्तीने बाईकवरून येत शर्मा यांना बंदुकीचा धाक दाखवत थांबवण्याचा प्रयत्न केला. शर्मा यांनी पळण्याचा प्रयत्न केल्यानंतर आरोपी जोगिंदर व त्याच्या सहकार्‍याने शर्मा यांच्यावर गोळीबार केला. त्यात शर्मा जखमी झाले. आरोपी जोगिंदर गुरगावमधील मितसूबिशी या जपानी कंपनीत कर्मचारी होता. त्याच्या गैरवर्तणुकीवरून शर्मा यांनी त्याला नोक रीवरून काढले होते. त्यानंतर शर्मा यांनी गंभीर परिणाम भोगायला लागतील, अशी धमकी देखील देण्यात आली होती.