भाऊसाहेब फुंडकरांच्या संसदीय कार्याविषयी ग्रंथ निर्मिती करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
श्रध्दांजली सभेस विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे,रेल्वेमंत्री पीयुष गोयल, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, परिवहनमंत्री दिवाकर रावते, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे,केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील,खासदार रावसाहेब दानवे, आमदार आकाश फुंडकर, शेकापचे आमदार जयंत पाटील, माजी आमदार बाळा नांदगावकर यांच्यासह फुंडकर परिवारातील सदस्यही उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, भाऊसाहेब एका पिढीला दुसऱ्या पिढीशी जोडणारे व्यक्तिमत्त्व होते. ते मंत्रिमंडळातील आमचे मार्गदर्शक होते. त्यांच्याकडे प्रचंड मोठा राजकीय सामाजिक अनुभव होता. जमिनीशी जोडलेले व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना प्रश्नांची जाणही मोठी होती. शेतकऱ्यांप्रती त्यांना प्रचंड कणव होती. त्यामुळेच त्यांच्यासारख्या शेतकऱ्यांच्या मुलाने आणि जन्मभर शेतकऱ्यांसाठी काम केलेल्या कार्यकर्त्याला कृषिमंत्री म्हणून स्थान मिळाले.