Breaking News

‘नेटफ्लिक्स’ च्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट


मुंबई : ‘ग्लोबल स्टेट’ अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रात मराठी चित्रपटांच्या प्रचार-प्रसाराबरोबरच विविध सामाजिक विषयांवर काम करण्याची तयारी नेटफ्लिक्स कंपनीने दर्शविली आहे. त्यासाठी राज्य शासन सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून नेटफ्लिक्सबरोबर काम करणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.

मनोरंजन क्षेत्रात अग्रेसर असलेल्या नेटफ्लिक्स माध्यम कंपनीच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भारतात विशेषतः महाराष्ट्रात राज्य सरकारबरोबर काम करण्याची तयारी दर्शविली. नेटफ्लिक्सचे जागतिक सार्वजनिक धोरण विभागाचे उपाध्यक्ष मोनिक मेश, आशिया- पॅसिफिक क्षेत्राचे व्यवस्थापकीय संचालक क्यूयेक यु चाँग, भारताच्या सार्वजनिक धोरण विभागाच्या संचालक अंबिका खुराणा आदींचा शिष्टमंडळात समावेश होता. यावेळी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे उपस्थित होते.