हॅन्डबॉल संघालाही हिरवा कंदील
मुंबई प्रतिनिधी : इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने एशियन गेम्समध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय पुरुष फुटबॉल संघाला हिरवा कंदिल दाखवला आहे. यामुळे भारतीय संघएशियन्स गेम्ससाठी पात्र ठरणार आहे. यासोबतच हॅण्डबॉल संघही पात्र ठरला आहे. फुटबॉल आणि हॅण्डबॉल दोन्ही संघ अत्यंत चांगली प्रगती करत असून त्यांनासंधी मिळाली पाहिजे असं इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव राजीव मेहता यांनी सांगितलं आहे.
‘फुटबॉल संघ प्रगती करत आहे. फुटबॉल संघ सध्या १६ व्या क्रमांकावर असून चांगली कामगिरी करत तो १० व्या क्रमांकावर पोहोचेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळेपुरुष संघाला पात्र ठरवण्यात आलं आहे’, असंही ते म्हणाले आहेत. हॅण्डबॉल संघाबाबात बोलताना, ते सध्या १२ व्या क्रमांकावर असून अजून चांगली कामगिरीकरतील अशी अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी घोडेस्वारी संघाला न पाठ्वण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय.
राजीव मेहता यांनी क्रिडा सचिवांनी गेल्या बैठकीत एशियन गेम्ससाठी एका चांगल्या संघाची निवड करण्यासाठी योग्य तो निर्णय घेण्यास सांगितलं होतं अशीमाहिती दिली आहे. ‘आम्हाला क्रिडा मंत्रालयाकडून कोणतंही पत्र मिळालेलं नाही. मात्र गेल्या बैठकीत क्रिडा सचिवांनी योग्य तो निर्णय घेण्याची सूचना केलीहोती’, असं मेहता यांनी म्हटलं आहे.