रमजान - आदर्श जीवन जगण्याचा प्रयत्न हवा
रमजान महिन्यात शेवटच्या दोन-तिन दिवसांत प्रत्येक लहान-मोठ्या माणसाच्या नावाने सदक-ए-फित्र (दान) दिले जाते. जकात ही काही आवश्यक नियम पूर्ण करणार्या धनिक ांवर फर्ज आहे. मात्र सदक-ए-फित्र प्रत्येक स्त्री-पुरुष, लहान मुलांवर देणे आवश्यक आहे. घरातील कर्त्या पुरुषाने कुटुंबातील सर्वांच्या वतीने दान दिले, तरी चालते. याचे प्रमाण माणसी सव्वा दोन शेर गहू किंवा त्याची किंमत देणे आवश्यक आहे. याला फितराही म्हणतात. ईदच्या नमाज पूर्वी कोणत्याही परिस्थितीत फितरा अदा झाला पाहिजे. फितराचे धान्य किंवा रोख रक्कम ही समाजातील गोरगरीब, अनाथ, विधवा (गरजू) अरबीमदरसे आदींना दान दिली जाते. आजारपणातही आजारी व्यक्तींच्या आरामासाठी दान (सदका) दिले जाते.
इस्लाम, धर्माने जगाला एक आदर्श जीवन प्रणाली प्रदान केली आहे. विज्ञान युगात आज जगभरात साडेतीन लाख वेबसाईट या इस्लाम धर्माच्या सरंजामशाहीवादी राष्ट्रे जगातील मुस्लीम व इस्लामच्या विरोधी कार्यरत असताना खुद्द अमेरिकेत आज लाखो लोक इस्लाम धर्म, कुरआनशरीफ व हदीसच्या अध्ययनात रममाण आहेत. प्रत्येक माणसाची आदर्श जीवनाची संकल्पना वेगळी आहे. प्रत्येकाला त्याचे हक्क मिळाले पाहिजे. कोणावरही अन्याय होता कामा नये. गरजूंना नेहमी मदत व सहकार्य करावे. प्राणीमात्रांवर दया करावी, समाजातील रुग्ण, आजारी, म्हतारी माणसे, विधवा महिला, मुले यांच्याकडे लक्ष द्यावे. आपल्यामुळे कोणी दुःखी, नाराज होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना इस्लामच्या शिकवणुकीत दिली गेली आहे.
या जगाचा गाडा चालविणारा परमेश्वर अर्थात अल्लाह आहे. इथे जे काही होते ते त्याच्या मर्जीनुसारच. आपल्या मर्जीप्रमाणे सर्व गोष्टी होत नाही. सध्या ब्रह्मांडचा शोध घेण्यासाठी बिंग बॅग प्रयोग सुरू आहे. त्याची मशिनरी मध्येच बिघडल्याने प्रयोग लांबणीवर टाकण्यात आला आहे.
निसर्गाचे प्रयोग असे कधी बिघडत नाही कारण त्यांना चालविणारी शक्ती ही सर्व शक्तीमान असल्याने व त्याचे नियोजन फार पूर्वीच होत असल्याने त्यात कधी बिघाड होत नाही. आपण आपले काम कितीही नियोजनपूर्वक केले तरी अचानक कधीकधी अशा घटना घडण्याचे कारण काय? तर हे सर्व आपल्या हातात नाही तर वरच्या (परमेश्वर)च्या हातात आहे हे म्हणता येईल.