Breaking News

दखल - भाजपचं मीठही मित्रपक्षांना अळणीच

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटकपक्षांतला दुरावा काही संपायला तयार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यानुसार भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे सेे लिब्रिटीजच्या भेटीगाठी घेत फिरत आहेत. माधुरी दीक्षित, श्रीराम नेने, रतन टाटा आदींच्या भेटीागाठी घेऊन भाजपच्या गेल्या चार वर्षांतील कामांची माहिती देत आहेत. सेेलि ब्रिटीजना राज्यसभेचं आश्‍वासन देऊन त्यांच्या फॉलोअर्सची मतं कशी पदरात पाडून घेता येतील, याचं नियोजन केलं जात आहे. कपिलदेव, सौरभ गांगुली यांच्या भेटीगाठीही त्याचाच भाग होता.

शिवसेना बर्‍याच दिवसांपासून भाजपवर नाराज आहे. शाह यांंनी मातोश्रीवर पायधूळ झाडली. त्यासाठी त्यांना पूर्वीचा हेका सोडावा लागला. दोन-अडीच तास उद्धव ठाकरे यांच्यांशी त्यांनी गुफ्तगू केलं. त्यातून हाती काही लागलं असेल, असं वाटत नाही. त्याचं कारण शाह यांची पाठ वळताच शिवसेनेनं भाजपवरटी टीका पुढं चालू ठेवली आहे. खासदार संजय राऊत यांनी तर एकला चलो च्या भूमिकेवर शिवसेना ठाम असल्याचं जाहीर केलं आहे. ज्या राजकीय फेरजुळणीच्या उद्देशानं शाह मुंबईत आले , ते पाहता संपर्क अभियान फक्त संपर्कापुरतंच मर्यादित राहिलं, असा त्याचा अर्थ काढता येईल. भाजपला यापूर्वी मित्रपक्षांची मदत लागत नव्हती. त्यामुळं गेल्या चार वर्षांपासून भाजप मित्रपक्षांना क स्पटासमान वागणूक देत होता. पोटनिवडणुकीतील अपयश आणि पुढच्या वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीतील विरोधकांची होणारी एकजूट पाहून भाजपला आता सत्ता हातातून जाण्याची भीती वाटायला लागली आहे. सत्ता टिकवायची असेल, तर पूर्वीचा घमेंडीपणा सोडून द्यावा लागेल, याचं महत्त्व भाजपला पटलं आहे. भाजपची ही अगतिकता आता मित्रपक्षांच्या ही लक्षात यायला लागली आहे. पूर्वी देशात फक्त पीडीपी आणि शिवसेना हेच दोन पक्ष भाजपवर गुरगुरायचे. आता भाजपची अगतिकता लक्षात घेऊन सर्वंच मित्रपक्षांनी नख़ काढायला सुरुवात केली आहे. बिहारमध्ये मित्रपक्षांच्या भोजनात झालेली कुरघोडी त्याचंच प्रतिक आहे.
केंद्र सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गुरुवारी बिहारमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांसाठी आयोजित डिनर डिप्लोमसीतून काहीही निष्पन्न झालं नाही. चार वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्याच्या समारंभात मिष्ठान्न भोजन ठेवलं होतं; या भोजनातून तृप्तीचा ढेकर देण्याऐवजी तोंड कडू झालयसारखा चेहरा करून नेते बाहेर पडत होते. यावरून तिथं दिलेल्या भोजनात मीठच जास्त झालं होतं, की काय अशी शंका यावी. या सहभोजनाला जनता दल संयुक्त (जेडीयू), भाजप, लोकजन शक्ती पक्ष (लोजप) आणि राष्ट ्रीय लोकजन समाज पक्ष (रालोसप) नेते उपस्थित होते. लज्जतदार भोजनाचा आस्वाद घेतला, तरी विविध पक्षांच्या नेत्यांच्या जीभेवर एकतेची गोडी आली नाही. दुसरीकडं राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात दिल्लीत भेट झाली. या बैठकीत बिहारमध्ये महाआघाडीच्या उमेदवारांची निवड, अ‍ॅक्शन प्लॅन, अजेंडा सेटिंग ठरली. त्यावरून निवडणूक प्रचाराच्या केंद्रस्थानी तेजस्वी राहाणार असल्याचं दिसलं. पाटण्यातील भोजन समारंभाला मुख्यमंत्री नितीशकुमार, लोजपाचे प्रमुख रामविलास पासवान, उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय आणि राज्यातील मंत्री उपस्थित होते. रामविलास पासवान जेव्हा भोजनाच्या टेबलकडं वळाले, तेव्हा त्यांच्या समर्थकांनी गुंजे धरती-आसमान रामविलास पासवान’ अशा घोषणा दिल्या. या घोषणा थांबत नाहीत, तोच रालोसपा समर्थकांनीही उपेंद्र कुशवाहा जिंदाबाद’ची घोषणाबाजी सुरू केली. रालोसपा नेते उपेंद्र कुशवाह या भोजन समारंभाला उपस्थित नव्हते; मात्र त्यांचे समर्थक या वेळी आक्रमक दिसले. रालोसपा नेते नागमणि आणि आमदार ललन पासवान यांनी भोजन समारंभाला उपस्थित राहून बिहारमधील एनडीए आघाडीत सर्वकाही व्यवस्थित असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, जेव्हा नेतृत्वाची चर्चा सुरू झाली, तेव्हा आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ही रालोसपा नेते उपेंद्र कुशवाह यांच्या नेतृत्वात झाली पाहिजे, अशी जोरदार मागणी त्यांनी केली. रालोसपाची मागणी ऐकल्यानंतर जेडीयू नेते शांत कसे राहातील. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव श्याम रजक यांनी तर कोण काय म्हणतं, याच्याशी आम्हाला देणंघेणं नाही. आमच्यासाठी एवढंच महत्त्वाचे आहे, की 12 कोटी बिहारची जनता नितीशकुमार यांनाच मुख्यमंत्री म्हणून पाहू इच्छिते. गांधी आणि तेजस्वी यादव यांच्यात दिल्लीत गुरूवारी बैठक झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये 40 मिनिटं चर्चा झाली. उमेदवारांची निवड, आघाडीचा अ‍ॅक्शन प्लॅन, अजेंडा सेटिंग यासारख्या मुद्द्यांवर दोन्ही पक्षांच्या नेत्यांचं एकमत झालं. निवडणूक प्रचाराच्या केंद्रस्थानी तेजस्वी राहातील, हेदेखील बैठकीत निश्‍चित झालं. याशिवाय बिहार निवडणुकीशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काँग्रेस हायकमांड तेजस्वींसोबत चर्चा करेल, त्यांच्या उपरोक्ष कोणताही निर्णय होणार नाही. काँग्रेस आणि आरजेडी यांची आघाडी भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षांना पराभूत करण्यासाठी जागा वाटपाबाबत तडजोड करण्यासही तयार आहे. जेडीयूचे राष्ट्रीय महासचिव के.सी. त्यागी भोजन समारंभापूर्वी म्हणाले होते, की एनडीएची केवळ बिहारमध्येच नाही, तर देशातील स्थिती वाईट आहे. बिहारमधील सत्तेत भागीदार असलेल्या जेडीयूला त्रास दिला जात आहे. भाजपनं नितीशकुमारांच्या प्रतिमेचा सदुपयोग केला पाहिजे. जेडीयूला ना केंद्रीय मं त्रिमंडळात स्थान मिळालं ना एनडीएच्या रणनीती आणि धोरण निश्‍चितीमध्ये. भाजपनं नितीशकुमार यांच्या प्रतिमेचा सदुपयोग करून घेतला पाहिजे. 2014 प्रमाणे यंदा मोदी लाट नसेल तर एनडीएची केंद्रात पुन्हा सत्ता येणं अवघड आहे, असं जेव्हा सत्ताधारी पक्षाचा नेताच सांगतो, तेव्हा त्यांचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे.