निवडणूक निरीक्षक नरेंद्र पोयाम यांच्याकडून शिक्षक मतदारसंघ निवडणूक पूर्वतयारीचा आढावा
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ अंतर्गत अहमदनगर जिल्हयातील 20 मतदान केंद्रावर दिनांक 25 जून 2018 रोजी सकाळी 8 वाजता ते सायंकाळी 4 या कालावधीत मतदान होणार आहे. या मतदानासाठी अहमदनगर जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आढावा भारत निवडणूक आयोगाचे निवडणूक निरीक्षक नरेंद्र पोयाम यांनी घेतला. निवडणूक प्रक्रिया शांततामय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक संचलन पूर्वतयारीबाबत झालेल्या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, जिल्हा पूनर्वसन अधिकारी ज्योती कावरे, अधीक्षक अभियंता भोसले तहसीलदार सुधीर पाटील , जिल्हा समाज कल्याण अधिकारी नितिन उबाळे आदि उपस्थित होते.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी आनंदकर यांनी अहमदनगर जिल्हयातील निवडणूक तयारीची माहिती दिली. जिल्हयात 20 मतदार केंद्रे असून एकूण 13 हजार 439 मतदार आहेत. त्यामध्ये पुरुष आणि महिला आहेत. दिनांक 25 जून 2018 रोजी मतदान होणार असून मतदान केंद्र निश्चिती झाली आहेत.
निवडणूकीच्या यशस्वी संचलनाकरिता विविध कक्षांची स्थापना, आदर्श आचारसंहिता अंमलबजवणी करीता पथकाची स्थापना करण्यात आली आहे. संपर्क आराखडा व मतदान अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षणाचे आयोजना संदर्भात सविस्तर माहिती दिली. पुरेशा प्रमाणात वाहने व मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात येत असून पोलिस बंदोबस्तही चोख ठेवण्यात येणार आहे.