Breaking News

दहावीच्या निकालात मुलींचेच वर्चस्व राज्याचा निकाल 89.41 टक्के ; कोकण विभाग अव्वल


पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला.
मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत निकाल जाहीर केला. माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा राज्याचा एकूण निक ाल 89.41 टक्के इतका लागला असून राज्यात कोकण विभागाने बाजी मारली आहे. तर यंदाही निकालात मुलींनी आपले वर्चस्व कायम ठेवत बाजी मारली आहे.
कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 96 टक्के लागला आहे. याही वर्षी दहावीच्या निकालात राज्यात मुलींनी बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 91.17 तर मुलांची 87.27 टक्के इतकी आहे. राज्यातील नऊ विभागात एकूण 16 लाख 46 हजार 250 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 16 लाख 28 हजार 613 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातले 14 लाख 56 हजार 203 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 96 टक्के इतका लागला तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा 85.97 टक्के इतका लागला आहे.
यंदा राज्यभरातून 1,628,613 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 1,456,203 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. राज्याचा एकूण निकाल 89.41 टक्के इतका लागला आहे. राज्य माध्यमिक बोर्डाने यंदा मार्च महिन्यात माध्यामिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता दहावीची परीक्षा (1 मार्च ते 24 मार्च दरम्यान) घेतली होती. यामध्ये कोकण विभाग 96 टक्के गुणांसह अव्वल ठरला असून नागपूर विभाग 85.97 टक्क्यांसह तळाशी गेल्याचे चित्र आहे. निकालात कोल्हापूर विभाग 93.88 टक्क्यांसह दुस-या स्थानावर असून 92.08 टक्क्यांसह पुणे विभागाने निकालात तिसरे स्थान पटकावले आहे. त्यापाठोपाठ मुंबई विभाग 90.41 टक्क्यांसह चौथा आणि औरंगाबाद 88.81 टक्क्यांसह पाचव्या स्थानावर आहे. नाशिक विभाग 87.42 टक्क्यांसह सहाव्या आणि अमरावती विभाग 86.49 टक्क्यांसह सातव्या क्रमांकावर असून लातूर विभागाचा निकाल 86.3 टक्के इतका आहे.
मुलींची घोडदौड कायम:
राज्यभरातून 886106 मुले आणि 742507 मुलींनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 773339 मुले आणि 682864 मुली उत्तीर्ण झाल्यात. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्के वारी 87.27 आणि मुलींची 91.97 टक्के इतकी आहे. त्यामुळे यंदाच्या परीक्षेतही मुलींची आगेकूच असल्याचे दिसून आले.
------------------------------------
विभाग निहाय निकाल
कोकण - 96
पुणे - 92.08
नागपूर - 85,97
औरंगाबाद - 88.81
मुंबई - 90.41
कोल्हापूर - 93.88
अमरावती - 86.49
नाशिक - 87.42
लातूर - 86.30