Breaking News

एकाच कुटुंबातील 5 जणांची निर्घृण हत्या

नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात एकाच कुटुंबातील 5 जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरातील दिघोरी परिसरात राहणारे कमलाकर पवनकर यांच्यासहीत कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आली आहे. मृतांमध्ये लहान मुले व वृद्ध महिलेचा समावेश आहे.

याबाबत हाती आलेल्या अधिकृत माहितीनुसार भाजप कार्यकर्ते कमलाकर पवनकर ( वय 51), त्यांची पत्नी वंदना पवनकर (40 वर्षे) मुलगी वेदांती पवनकर (12 वर्षे) आणि आई मीराबाई पवनकर (72 वर्षे) यांची हत्या करण्यात आली आहे. तर कमलाकर यांचा दोन वर्षाचा भाचा कृष्णा पालटकर यांचीही निघृणपणे हत्या करण्यात आली आहे. या हत्याकांडामुळे नागपूरकर प्रंचड हादरले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास धारदार शस्त्राने ही हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी आढळून आलेले आहे. दरम्यान कौटुंबिक कलहातून हे हत्याकांड झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. कमलाकर पवनकर यांचा प्रॉपर्टीचा व्यवसाय असून ही हत्या संपत्तीच्या वादातून झाला असल्याचा संशय आहे. कमलाकर पवनकर यांची 10 एकर जमीन असून त्यावरुन त्यांच्यात आणि नातेवाईकांमध्ये वाद सुरु होता, अशी प्राथमिक माहिती आहे. त्यादृष्टीनेही पोलिसांचा तपास सुरु आहे. पोलिसांनी केलेल्या घटनास्थळाच्या पाहणीवरून घरात कुणीही जबरदस्तीने प्रवेश केल्याचे निष्पन्न होत नसल्याने कोणीतरी ओळखीच्या व्यक्तीने हत्या केला असल्याचाही संशय आहे. पोलिसांना अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास करत आहेत. संशयित आरोपीच्या शोधासाठी नऊ पथके गठित करण्यात आली आहेत.