Breaking News

प्रथम वर्ष बी. फार्मसी प्रवेशा साठी प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्र सुरु


प्रवरानगर : 
लोणी येथील प्रवरा औषधनिर्माणशास्र महाविद्यालयामध्ये  प्रथम वर्ष बी. फार्मसी प्रवेशा साठी  प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्र सुरु झाले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या केंद्रातील सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. सुनील निर्मळ यांनी केले आहे.
       प्रवरानगर येथील या केंद्रामुळे  जिल्हयातील विविध भागातील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिये बाबत सोय होणार आहे. सदर ऑनलाईन प्रक्रियेच्या रजिस्ट्रेशन ची मुदत ११ जून ते १९ जून पर्यंत सुरु राहणार आहे.ही प्रक्रिया थोडक्यात अशी असेल ऑनलाईन रजिस्ट्रेशन  ११ जुन २०१८ ते १९ जुन २०१८ गुणवत्ता यादी २० जुन रोजी जाहीर होईल गुणवत्ता यादी बद्दलचे आक्षेप  २१ आणि २२ जुन २०१८ रोजी सायंकाळी ५.०० वा पर्यंत नोंदवता येतील २३ जुन २०१८ रोजी  अंतिम गुणवत्ता यादी व पहिल्या  साठीच्या रिक्त जागा जाहीर केल्या जातील. तर, २४ ते २७ जून २०१८ रोजी विद्यार्थ्यानी  पहिल्या  राऊंड साठी आपापले पसंतिक्रम स्वतःच्या lऑनलाईन  भरुन खात्री करणेआवश्यक आहे. २८ जून २०८ रोजी विद्यार्थ्यांना पहिल्या मध्ये  मिळालेल्या जागा प्रकाशीत करण्यात येतील.२९ जून ते २ जूलै २०१८ सायंकाळी  ५.०० वाजे पर्यंत ज्यांना  पहिल्या राऊंड  मध्ये  जागा न मिळाल्यास प्रवेश सुविधा केंद्रावर विद्यार्थ्याने स्वतः जाऊन रिपोर्ट  करणे आवश्यक आहे. ३ जुलै २०१८ रोजी दुसऱ्या राउंड  साठीच्या रिक्त जागा प्रकाशीत करण्यात येतील. तरी, विद्यार्थ्यानी  दुसऱ्या  राऊंड साठी ४ ते ६ जुलै २०१८ रोजी आपापले पसंतिक्रम   बदलण्यासाठी स्वतःच्या ऑनलाईन भरुन खात्री  करावी . दुसऱ्या राउण्ड ची यादी ७ जुलै २०१८ रोजी प्रकाशित करण्यात येईल  जर विद्यार्थ्याला पहिल्यांदाच दुसऱ्या राऊंड  मधे जागा मिळाली असेल तर .अश्या विद्यार्थ्यांनी ८ ते १० जुलै पर्यंत प्रवेश सुविधा केंद्रावर स्वतः जाऊन रिपोर्ट करावा.  
               तसेच ११ जुलै २०१८ रोजी तिसऱ्या राउण्ड  साठीच्या रिक्तजागांची यादी  प्रकाशीत करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना  आधी मिळालेली आणि ARC ला जाऊन स्वीकारलेली जागा बदलन्यासाठी १२ ते १४ जुलै २०१८ पर्यंत तिसऱ्या  राऊंड साठी आपापले पसंतिक्रम स्वतःच्या login मधुनभारत येतील . हि यादी १५ जुलै २०१८  राजी प्रकाशित करण्यात येईल. ज्या  विद्यार्थ्याला पहिल्यांदाचतिसऱ्या राऊंड  मध्ये जागा मिळाली असेल अश्या विद्यार्थ्यांनी १६ ते १८ जुलै २०१८ रोजी सायंकाळी  ५.०० वाजे पर्यंत प्रवेश सुविधा केंद्रावर जाऊन  रिपोर्ट करावा. प्रवेशा समंधी अधिक माहितीसाठी प्रवरा औषधनिर्माणशास्र महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. सुनिल निर्मळ मोबा.नं . ९४२३७८७४१३ आणि डॉ  नचिकेत दिघे मोबा.नं ९८९०२१५७२९ यांचेशी संपर्क साधावा.