Breaking News

अटलबिहारी वाजपेयी एम्स रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांना दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टीट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस म्हणजेच एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थामुळे अटलबिहारी वाजपेयी सार्वजनिक आयुष्यापासून दूर आहेत. काही निवडक लोकांनाच त्यांना भेटण्याची परवानगी दिली जाते. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज सातत्याने त्यांच्या संपर्कात असतात. वाजपेयी यांना नियमित चेकअपसाठी एम्स मध्ये दाखल करण्यात आलं आहे अशी माहिती भाजपने एक प्रसिद्धी पत्रक काढून दिली आहे. एम्स चे संचालक डॉ. रणदिप गुलेरिया यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांची टीम वाजपेयी यांच्यावर उपचार करत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं एम्सनं सांगितलं आहे.