Breaking News

रत्नागिरीत सरासरी 28 मिलिमीटर पाऊस


रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या 24 तासांत सरासरी 28.67 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती जिल्ह्याच्या नियंत्रण कक्षातून देण्यात आली. सर्वाधिक 74 मिलिमीटर पावसाची नोंद संगमेश्‍वर तालुक्यात झाली.
गेल्या 24 तासांत तालुकानिहाय पडलेला पाऊस असा - (आकडे मिलीमीटरमध्ये) मंडणगड- 30, दापोली- 15, खेड- 14, गुहागर- 17, चिपळूण 2, संगमेश्‍वर- 74, रत्नागिरी- 49, लांजा- 25 आणि राजापूर 32. सुकवली (ता. खेड) येथील चेतन देवजी निकम यांच्या घराचे पावसामुळे 6 हजार 800 रुपयांचे, तर उंबरोली (ता. चिपळूण) येथील ज्ञानोबा महिपत घोडके यांच्या घरावर वीज पडून अंशत: नुकसान झाले. संगमेश्‍वर तालुक्यात वाशी तर्फे रत्नागिरी येथे हिल हॉटेलजवळील रस्त्यावर झाड पडले. देवळे येथील विनायक जयराम बागवे यांच्या घराचे अंशत: नुकसान, श ृंगारपूर येथे गजानन शंकर सुर्वे यांच्या घरावर वीज पडून घराचे अंशत: नुकसान झाल्याची नोंद नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.