सर्व पातळीवर फडणवीस सरकार कुचकामी - अजित पवार
नाशिक : नाशिक मध्ये अवाढव्य कर लावला जातोय त्यामुळे संपुर्ण शहरात असंतोषाचे वातावरण बनलेले असतांना हे सरकार बोलायला तयार नाही. नाशिकात एकच अधिकारी संपुर्ण महापालिकेचा मालक बनलेला आहे. राज्यात शेतकरी आंदोलन करत आहेत, त्यामुळे हे सरकार सर्वच पातळ्यांवर कुचकामी ठरलंय असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सरकार वर केला. ते विधान परिषदेची रणनीती आखण्याकरिता नाशिक जिल्हा दौर्यावर आले असता बोलत होते .
याप्रसंगी व्यासपीठावर माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, शोभा बच्छाव, शहराध्यक्ष शरद आहेर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, दिलीप बनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यात कायदा व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडालेला आहे. शिक्षण संस्था अडचणीत आणि शिक्षण भरती थांबवली आहे. राज्य लोकसेवा आयोगात ढ मुलं पास होत आहेत. त्यामुळे असं वाटत की, मी गेल्या पस्तीस वर्षापासून राजकारण समाजकारण करतोय आमची सत्ता असतांना देखील इतकी वाईट परिस्थिती नव्हती इतकी वाईट परिस्थिती आत्ताच्या साडे चार वर्षात झाली आहे. पाकिस्तानातुन साखर आयात केली आणि इथल्या शेतकर्यांच्या साखरेचे भाव पाडले हे केंद्र सरकारचं डोकं तर दुसरीकडे शेतकर्यांकडून खरेदी केलेली चौदाशे कोटींची तुर सडत पडली आहे, याला काय म्हणावं . शेतकर्यांना जगूच द्यायचं नाही काय असं काय ह्या सरकारने ठरवलं आहे की काय ? असाच प्रश्न आता मला पडलाय. मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात सात दिवसात बारा खून होतात. तिकडे औरंगाबादमध्ये दंगल झाली प्रचंड मोठे नुकसान झाले याला जबाबदार कोण? दंगलीत नुकसान झालेल्यांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी.
शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी ह्या शहराच्या पालकमंत्र्यांना नाशिकला यायला वेळ नाही. तेव्हा कसा होणार नाशिकचा विकास, त्यामुळे नाशिककर जनतेने आता भुल थापाना बळी पडू नये असं माझं आवाहन आहे. काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर इतर मित्र पक्ष मिळून एक दिलाने उमेदवार निवडून द्यावा, असं माझं सर्वानाच आवाहन आहे. कारण की आजकाल मतदान करतांना चुकीच्या पद्धतीने मतदान करतात त्यामुळे जे-जे सदस्य मतदान करतील त्यांनी नक्की पत पत्रिका बघूनच मतदान करा, असे पवार बोलताच सभागृहात हशा पिकला.
आता घड्याळामागे धावा ः पवार
नाशिककर फार मजेदार आहेत ते लाटे सारखे आहेत एखादा भावला की त्यालाच पावतात. मागे त्यांना इंजिन आवडलं म्हणुन त्याच्याच मागे धावले एक हाती सत्ता दिली. आत्ता ही तसंच केलं दत्तक घेतलंय म्हणुन सांगितलं आणि कमळाच्याच मागे धावले आता कधी तरी हाताच्या घडयाळ मागे धावा म्हणजे मलाही बरं वाटेल. विधान परिषद निवडणुक ीच्या पार्श्वभूमीवर आघाडीचा कार्यकर्ता मेळावा होता मात्र, काँग्रेसचे बोटावर मोजण्याइतके पदाधिकारी सोडले तर बर्याच जणांनी मेळाव्याला हजेरी लावली नाही. राष्ट्रवादी का ँग्रेसचे कार्यकर्ते फारसे दिसले नाही. त्यामुळे अजित पवारांच्या एक दिलाने काम करा, या आवाहनाला कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी फारशी हाक दिली नसल्याचे जाणवले.