Breaking News

सौभाग्य योजनेत महावितरणचे काम वेगात राज्यातील सुमारे अडीच लाख घरांना २ हजार वाड्यापाड्यांना डिसेंबर २०१८ पर्यंत वीजजोडणी

मुंबई, दि. ८ :राज्यातील सर्वच ४१ हजार ९२८ गावांचे, ९८ हजार ३५६ वाड्यापाड्यांचे तसेच ग्रामीण भागातीलसुमारे १ कोटी ३७ लाख ९२ हजार घरांचे विद्युतीकरण झाले असून उर्वरित वाड्यापाड्यांत व घरांनासौभाग्य योजना तसेच दीनदयाल उपाध्याय योजनेतून डिसेंबर २०१८ पर्यंत वीज देण्याचे काम वेगातसुरू आहे.

राज्यात ग्रामीण भागातील घरांची संख्या सुमारे १ कोटी ४० लाख २६ हजार ३५३ आहे. त्यापैकी१ कोटी ३७ लाख ९२ हजार १२५ घरात यापूर्वीच वीज पोहोचली आहे. हे प्रमाण ९८.३३ टक्के एवढे आहे.उर्वरित २ लाख ३४ हजार २२८ घरांत सौभाग्य व दीनदयाल योजनेंतर्गत वीजजोडणी देण्यात येणार असून याबाबतची कामे मोठ्या प्रमाणात सूरू आहेत. मार्च २०१८ अखेर राज्यातील गावांची संख्या ४१ हजार ९२८ असून महावितरणने या सर्व गावांत वीज पोहोचविली आहे. यात २०१८ मध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या १११ गावांचाही समावेशआहे.