तृणमूलच्या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या
पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणातील कुलताली येथे तृणमूल काँग्रेसच्या आरिफ गाझी या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. तर पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणातील आमदंगा येथील साधनापूरमध्ये मतदान सुरू असताना केंद्राबाहेर सोमवारी क्रूड बॉम्बचा स्फोट झाला. यात 20 जण जखमी झाले असून 1 जण ठार झाला आहे. आत्तापर्यंत झालेल्या हिंसाचारात 7 जणांचा मृत्यू झाला आहे.