Breaking News

दिव्यांगांच्या घरकुलांसाठी शिवसेना कटिबद्ध : खा. लोखंडे


संगमनेर दिव्यांगांच्या तक्रारी रास्त आहेत. समाजाचा एक अविभाज्य घटक असलेल्या या देशबांधवांना योग्य त्या सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यातील सर्व पात्र दिव्यांगांना घरकुल मिळावे, यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे, अशी ग्वाही उत्तर जिल्ह्याचे खा. सदाशिव लोखंडे यांनी बोलत होते. 
संगमनेर नगरपरिषदेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर मंगलकार्यालयात अपंग सहाय्य सेनेच्यावतीने आयोजित दिव्यांग वधूवर परिचय मेळावा नुकताच संपन्न झाला. यावेळी खा. लोखंडे बोलत होते.

याप्रसंगी माजी मंत्री बबन नाना घोलप, अपंग सहाय्य सेनेचे जिल्हाध्यक्ष जालिंदर लहामगे, पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, दिलीप साळगट, शहर प्रमुख अमर कतारी, समाज कल्याण अधिकारी शुभांगी पालवे, राजेश वाकचौरे, संजय फड, अप्पा केसकर आदी उपस्थित होते. यावेळी दिव्यांगांना मिळणारे सहाशे रुपये मानधन अतिशय तुटपुंजे आहे. यात वाढ व्हावी आणि हा सर्व निधी शंभर टक्के खर्च झाला पाहिजे, अशी अपेक्षा यावेळी अनेकांनी व्यक्त केली. दिव्यांग वधूवर परिचय मेळाव्यात ११ विवाह निश्चित झाल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.