केडगावमध्ये दगडफेक
अहमदनगर/प्रतिनिधी : शहरातील नेहमीच संवेदनशील परिसर म्हणून ओळखला जाणार्या केडगाव येथे मंगळवारी सांयकाळी सातच्या सुमारास दगडफेक करण्यात आली. यामुळे के डगावमध्ये काही वेळ तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र पोलिसांनी वेळेत येत परिस्थिती नियत्रणांत आणल्यामुळे पुढील अनर्थ टळला. नगर-रोडवरील केडगाव प रिसरातील पंचम वाईन्स समोर दोन जणामध्ये गाडी धुण्यावरून भांडण झाले, या भांडणाचे पर्यावसान दगडफेकीत झाले, त्यामुळे अनेकांची धावपळ उडाली. त्यामुळे काही वेळ तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. दगडफेकीची माहिती मिळताच कोतवालीचे पोलीख निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी फौजफाटयासह घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.
