Breaking News

लाच घेतल्याप्रकरणी बेलिफला सक्तमजुरी


संगमनेर : संगमनेरचे जिल्हा व सत्र न्यायालयाने अकोले येथील दिवाणी न्यायालयातील कैलास लक्ष्मण भरितकर या बेलिफला न्यायालयाने लाच घेतल्याप्रकरणी दोषी ठरवत चार वर्षे सक्तमजुरी, दहा हजार रुपयांचा दंड आणि दंड भरल्यास सहा महिने कैदेची शिक्षा सुनावली. 
दि. २७ जानेवारी २०१६ रोजी अकोले न्यायालयातील सहाय्यक अधीक्षकांच्या कक्षात कैलास भरितकर आणि दिनेश बनसोडे या दोघांना लाचलुचपतने दोनशे रुपयांची लाच घेतांना पकडले होते. यासंदर्भात अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीविरोधात संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश भोसले यांच्यासमोर हा खटला सुरु होता. सरकारपक्षाच्यावतीने अॅड. मच्छिंद्र गवते यांनी काम पाहिले.

भरितकर अकोले येथील कनिष्ठस्तर दिवाणी न्यायालयात काम करत असतांना तक्रारदाराने नगरच्या जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले होते. त्याची नोटीस बजावून तसा अहवाल न्यायालयाला सादर करण्यासाठी दोनशे रुपयांची लाच स्विकारली होती.