Breaking News

प्रा. सतीश चव्हाण यांना पीएचडी


कुळधरण - नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयाचे प्रा. सतीश चव्हाण यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची रसायनशास्त्र विषयातील पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. सिंथेसिस ऑफ पिर्‍याझोल अ‍ॅण्ड थायोफिन डेरीव्हेटिव्हज अ‍ॅण्ड स्टडी ऑफ देअर बायोलॉजीकल ऍक्टिव्हीटी या विषयावर त्यांनी संशोधन प्रबंध सादर केला होता. त्यांचे रसायनशास्त्र विषयात 23 पेपर्स आतापर्यंत विविध आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना दादासाहेब बिडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.बी.टोचे व नाशिकच्या के.टी.एच.एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.बी. गायकवाड, डॉ. एम.एन. जाचक यांचे मार्गदर्शन लाभले. गोखले एज्युकेशन संस्थेचे सचिव डॉ. मो.स. गोसावी, संचालक डॉ. दिप्ती देशपांडे, मानव संसाधन व विकास विभागीय सचिव व प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, उपप्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी, स्वप्नील जावळे, अमोल जावळे यांनी अभिनंदन केले. प्रा. सतीश चव्हाण मुळचे कोकणगाव ता. कर्जत येथील रहिवासी आहेत. त्यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.