Breaking News

‘प्रवरा’च्या विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड


प्रवरानगर : येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील औषधनिर्माणशास्र महाविद्यालयामध्ये मॅकडॉल्स फार्मासुटिकल्स प्रा. लि. या कंपनीने घेतलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी या महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांची निवड केली. हे विद्यार्थी या नामांकित कंपनीत रुजू होतानाच त्यांना दीड लाख रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे, अशी माहिती प्राचार्य दत्तात्रय थोरात यांनी दिली.
यामध्ये राहुल वाडेकर, ऋषिकेश गुंजाळ, अनिकेत भाग्यवान आणि विजय कोळेकर या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांची मॅकडॉल्स फार्मासुटिकल्स प्रा. लि. या कंपनीमध्ये प्रॉडक्शन या विभागात निवड झाली. त्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे समन्वयक प्रा. आर. बी. कोते, प्रा. व्ही. पी. आरगडे, प्रा. ए. व्ही. राजदेव, प्रा. एस. एस. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे राज्याचे विरोधी पक्षनेते व प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर आदींसह शिक्षकांनी अभिनंदन केले.