दहशतवाद्यांच्या हल्ल्यात महाराष्ट्रातील 5 आमदार बचावले पाकच्या शस्त्रसंधी उल्लंघनात 4 जणांचा मृत्यू
कठुआ - जम्मू काश्मीरला गेलेल्या महाराष्ट्रातील 5 आमदारांवर अतिरेकी हल्ला झाला आहे. मात्र, सुदैवाने हे पाच आमदार अतिरेक्यांच्या ग्रेनेड हल्ल्यातून बचावले आहेत. शिक्षक आमदार विक्रम काळे, तुकाराम काते, किशोर पाटील, सुधीर चव्हाण आणि सुधीर पारवे अशी या आमदारांची नावे आहेत. पंचायत राज समितीच्या कामकाजाचा अभ्यास करण्यासाठी हे आमदार काश्मिर दौर्यावर गेले होते. काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात बुधवारी दुपारी साडे बारा- एकच्या दरम्यान ही घटना घडली आहे. या 5 आमदारांसोबत आणखी 20 जण होते. हे सर्व पोलीस संरक्षणामध्ये अनंतनागच्या बिजबिहारी भागातून प्रवास करत असताना हा हल्ला झाला आहे. मात्र सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.
दरम्यान, पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या तोफांच्या मार्यात बुधवारी जम्मू, सांबा आणि कठुआमध्ये 4 लाकांचा जीव गेला आहे, तर 30 लोक जखमी झाल्याची माहिती अधिकार्यांनी दिली. दरम्यान पाकिस्तानने आर. एस. पुरा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी ट्विट केले असून, त्यात म्हटले आहे, की जम्मूमधील कठुआ ते अंखूर येथे सीमारेषेवर रात्रभर झालेल्या गोळीबारात आत्तापर्यंत 4 लोकांचा जीव गेला आहे, तर 30 लोक जखमी झाले आहेत. आर. एस. पुरा, अरनिया, रामघर आणि हिरानगर सेक्टरसारख्या आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भागातून 40 हजाराहून अधिक नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागले आहे. तर काही स्थलांतरितांनी प्रशासनाच्यावतीने लावण्यात आलेल्या छावण्यांमध्ये आसरा घेतला आहे. दरम्यान आज सकाळी अरनिया सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनात एक नागरिक जखमी झाला होता. 18 मे रोजी आर. एस. पुरा आणि आरनिया सेक्टरमध्ये झालेल्या शस्त्रसंधी उल्लंघनात बीएसएफचा एक जवान आणि 4 नागरिकांचा जीव गेला होता. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बुलेटप्रुफ गाड्या पाठवून संबंधित गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे. मागील काही आठवड्यांपासून पाकिस्तानकडून जम्मू काश्मीरमधील हिरानगर, सांबा, रामगड, आरनिया आणि सुचेतगड या ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात तोफांचा मारा आणि गोळीबार होत आहे.
सीमेवरील 40 हजार रहिवाशांचे स्थलांतर
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी भागात आणि सैन्याच्या सुविधा केंद्रांवर सासत्याने होत असलेल्या हल्ल्यांमुळे सीमारेषेवरील 40 हजाराहून अधिक नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागले आहे. तर काही स्थलांतरितांनी प्रशासनाच्यावतीने लावण्यात आलेल्या छावण्यांमध्ये आसरा घेतला आहे. यातील जास्तीत जास्त लोकांनी आपल्या नातेवाईक अथवा मित्रांच्या घरी राहण्यास पसंती दिली आहे. प्रत्येक कुटुंबातून एका व्यक्तीला जनावरांना सांभाळण्यासाठी आणि घरफोड्यांपासून घरांचे संरक्षण करण्यासाठी मागे ठेवण्यात आले आहे. पाकिस्तानकडून चिथावणी देण्याच्या उद्देशाने गोळीबार आणि तोफांचा मारा करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.