Breaking News

भारतीय न्यायव्यवस्थेचा काळा दिवस : कोळसे-पाटील


दिवंगत न्यायमूर्ती लोया यांच्या संशयास्पद हत्येबाबतची याचिका फेटाळून सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा निकाल दिला आहे. हा निकाल म्हणजे भारतीय न्यायव्यवस्थेचा काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे समाधान झाले नसल्याचेही न्या. पाटील म्हणाले. लोया यांच्या केसमध्ये चौकशीचे निर्देश देऊन न्यायव्यवस्थेला अग्निपरीक्षेतून बाहेर पडण्याची एक संधी होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही संधी गमावली असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूबाबत ज्या डॉक्टरांनी अहवाल दिलेले आहेत, ते अहवालही संशयास्पस्द असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच ज्या डॉक्टरांनी अहवाल दिले, त्यापैकी एक डॉक्टर या सरकारमध्ये मंत्री असलेल्या व्यक्तीचा जवळचा नातेवाईक असल्याचेही पाटील म्हणाले.