आज भोयरे गांगर्डात भैरवनाथ यात्रोत्सव
पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा ग्रामस्थांचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ यात्रा उत्सवास आज प्रारंभ होत आहे. बुधवारी भैरवनाथांस तेल लावण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. देवास तेल लागल्यानंतर ग्रामस्थ आपापल्या शेतातील सर्व कामे बंद ठेवतात, सध्या शेतीच्या मशागतीची कामे सुरू आहेत. मात्र तेल लागल्यानंतर पाच दिवस सर्व कामे बंद ठेवली जातात. याला मोढा असे म्हणतात. ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून पहावयास मिळते.
स. 6 वाजता महाआरतीने यात्रेस प्रारंभ होत आहे. दिवसभर दर्शनासाठी मंदीर खुले करण्यात येणार आहे. सायं. 4 वाजता रसाळवाडी येथिल मानाची काठी मंदीरासमोर आल्यानंतर सर्व काठ्यांचे एकत्रित पूजन करण्यात येते. त्यानंतर गावातून सवाद्य काठ्यांची मिरवणूक काढली जाते. काठ्या मंदीरासमोर आल्यानंतर शेरणी वाटप, दंडवत, देवाला गोड पुरणपोळीचा नैवद्य दाखवणे आदी कार्यक्रम पार पडतात. रात्री 9 वाजता छबीना मिरवणुक निघेल. दरम्यान गेल्यावर्षी यात्रेच्या लोकवर्गणीतून शाळा डिजिटल करण्याचा ऐतिहासिक निर्णय ग्रामस्थांनी घेतला व आ. विजय औटी यांच्या हस्ते डिजिटल शाळेचे उद्घाटन करण्यात आले. चालू वर्षी देखील लोकवर्गणीतून यात्रेनिमित्त तमाशाचा खर्च टाळून मंदीराच्या सभामंडपाचे काम ग्रामस्थांच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. यात्रेनिमित्त मंदीरावर आकर्शक विद्युत रोषनाई करण्यात आली आहे. येणार्या भाविकांसाठी दर्शन रांगा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकिय व्यवस्था तसेच वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
दुसर्या दिवशी 4 वा. जंगी हगामा होणार आहे. यादरम्यान पारनेर तालुक्यासह अहमदनगर, पुणे, श्रीगोंदा येथिल मल्ल हजेरी लावतात. येणार्या भाविकांनी महादेव मंदीर सभामंडपासाठी सढळ हाताने देणगी द्यावी, तसेच परिसरातील भाविकांनी यात्रेनिमित्त दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच भाऊसाहेब भोगाडे, उपसरपंच दौलतराव गांगर्डे तसेच भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.