Breaking News

बिजेएस कर्जत शाखा विविध पद्धतीने कामाचे महत्व सांगणार

तालुक्यात जी गावे स्पर्धेत सहभागी आहेत. मात्र, अद्यापही काम सुरू केले नाही. अशा एका गावात दररोज जाऊन पहाटे श्रमदान करायचे व त्यानंतर गावातून प्रभात फेरी काढून गावाला या कामाचे महत्व पटवून द्यायचा निर्णय काल बिजेएसच्या कर्जत शाखेने घेतला व या उपक्रमात कर्जतचे तहसीलदार किरण सावंत, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सूपेकर, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष अभय बोरा, तालुका प्रकल्प संचालक आशिष बोरा, वैभव शहा, प्रवीण मुनोत, भूषण देसरडा, अनिल खाटेर, धन्यकुमार खाटेर, अनिकेत खाटेर, यश बोरा आदीसह रोटरीचे अध्यक्ष नितीन देशमुख, श्रीराम गायकवाड, मेडिकल असो. गणेश काळदाते, डॉक्टर असो. डॉ. राजेंद्र खेत्रे अशा विविध सामाजिक संघटनांचे लोक, पाणी फाउंडेशनची सर्व टीम सहभागी झाले होते.आज सकाळी 5ः30 वाजता बिजेएस टीम निघाली 6 वा. या वेळेत डोंगर मध्यावर 7 ः 30 श्रमदान केले, तर 7 ः 30 ते 8ः00 वा. प्रभात फेरी काढली व जनजागृती केली. याचा सकारात्मक परिणाम गावावर झाल्याचे दिसून आले. पानी फाउंङेशन टीम तालुका समन्वयक अमोल लाङगे, योगेश अभंग, बाळासाहेब बगाटे, जयदिप जगताप, मगेश पिचङ, बाळासाहेब पाङे यावेळी उपस्थित होते.