Breaking News

महाविद्यालयीन परीक्षांना प्रारंभ, कॉपीबहाद्दरांवर नजर


महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षांना सुरूवात झालेली आहे. शहरातील शाळा महाविद्यालयांच्या आवारामध्ये कॉपीचे प्रकार सुरू आहेत. त्याचबरोबर कॉपीमुक्त परिक्षा केंद्र करण्यासाठी महाविद्यालयांमध्ये समित्या स्थापन केल्या जात आहेत. त्याचबरोबर कॉपी बहाद्दरांना चाप बसविण्याचा प्रयत्न महाविद्यालयीन स्तरांवर केला जात आहे. तरिही आजमितीस महाविद्यालयांच्या आवारामध्ये कॉपीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. महाविद्यालयांमध्ये दोन वेळा विद्यार्थ्यांची तपासणी करूनच परिक्षाकेंद्रामध्ये पाठविले जाते. यातूनच काहीवेळा महाविद्यालयामध्ये टवाळखोरांच्या अरेरावीस देखील शिक्षकांना सामोरे जावे लागते.