जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
जामखेड शहरातील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. चिमुकल्यांनी सादर केलेल्या बहारदार कलांनी जामखेडकरांचे मने जिंकली. यावेळी झालेल्या स्नेहसंमेलनात झूकझूक आगनगाडी... मामाच्या गावाला, मै हू परी, सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा यासारख्या नव्या जुन्या देशभक्तीपर गीतांसह हुंडाबदी, शिक्षणाचे महत्त्व, आईचं महत्त्व, राष्ट्रीय एकात्मतासारख्या नाट्यांचे सुंदर सादरीकरण करून लहान मूलांनी उपस्थितांची मने जिंकली.
गेल्या अनेक वर्षांनंतर प्रथमच उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले. यावेळी नगरसेवक अमित चिंतामणी, बिभीषण धनवडे, संदिप गायकवाड, शामीर सय्यद, फिरोज कुरेशी, शाकीर खान, मुकूंद सातपुते, जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक राम निकम, हाजी कलिमुल्ला कुरेशी, मौलाना खलील कासमी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सलिम बागवान, मुक्तार(टेलर) सय्यद, खेमानंद इंग्लिश स्कूलचे वेलसर, मजहर काझी हूसेन शेख, इम्रान कुरेशी, उमर कुरेशी, शाकीर शेख, जूबेर शेख आदी मान्यवरांसह शहरातील नागरीक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उर्दू शाळेचे मुख्याध्यापक रहिमोद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक शकील बागवान, अझहर सय्यद, वसीम शेख, समद शेख, आरफात कूरेशी तसेच महिला शिक्षिका नूसरत शेख, नूजहत शेख, हानिफा बागवान, मीरा मोमीन, आफरिन शेख, आलमास शेख, अस्मत पटेल, रजिया शेख, कौसर तांबोळी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.यावेळी शहरासह परिसरातील नागरिक आपल्या मुला-मुलींना उर्दू शाळेत प्रवेश द्यावा असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाला मुकूंद सातपुते, एकनाथ चव्हाण यांच्या रंगतदार सूत्रसंचालनाने रंगत आणली.