पारनेर तालुक्यातील पिंपळगावरोठा येथील श्री. क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान येथे कुलधर्म कुलाचार म्हणून केला जाणारा जागर गोंधळ देवस्थानच्या वतीने 300 रु. मध्ये जागरण व 300 रु. मध्ये गोंधळ करून दिला जातो. त्यातील 150 रु हे वाघे व गोंधळींना दिले जातात. राहिलेल्या 150 रु. सभामंडप मधील जागा, पिण्याचे पाणी व स्वच्छतेसाठी वापरले जातात. अत्यंत अल्पदरात भाविकांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती अध्यक्ष पांडुरंग गायकवाड यांनी दिली, वर्षभर ही सुविधा उपलब्ध असते. सध्याच्या परिस्थितीमध्ये जागरण गोंधळ घरी करण्यासाठी 10 ते 20 हजार रु. खर्च येतो व वाघे-गोंधळी पण उपलब्ध होत नाहीत म्हणून ही सेवा अल्प दरात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
क्षेत्र कोरठणला केला जातो कुलधर्म कुलाचार
Reviewed by Dainik Lokmanthan
on
12:45
Rating: 5